कल्पनारम्यवाद व राजकारण (Romanticism and Politics)
पाश्चात्त्य साहित्यामध्ये अनेक वर्षांपासून कल्पनारम्यवाद (Romanticism) व अभिजातवाद (Classicism) असे दोन वाङ्मयीन ‘वाद’ किंवा विचारप्रवाह प्रचलित आहेत. ह्या दोन ‘वादांना अनुसरून कल्पनारम्य साहित्य किंवा अभिजात साहित्य (विशेषतः काव्य) लिहिले गेले आहे व हे दोन प्रकारचे साहित्य परस्परांपासून अगदी भिन्न मानले गेले आहे. साधारणतः १६ व्या शतकापासून (शेक्सपिअरचा काळ) ते १९ व्या शतकापर्यंत हे साहित्यिक वाद …